इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी एका दिवसांपूर्वी जमावाने एका हिंदू मंदिराची नासधूस केली होती. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतातल्या करक जिल्ह्यात ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खैबर पख्तुनवामधील सरकारने मंदिराची पुर्नबांधणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंदिर पाडण्यामध्ये सहभागी असेलेल्या 45 जणांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी मंदिरावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला होता.
पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खैबर पख्तुनवा प्रांतातल्या करक जिल्ह्यात जमावाने एका मंदिराची नासधूस केली आहे. जमावाने सुरवातीला मंदिर पेटवून दिले आणि त्यानंतर तोडफोड करत नासधूस केली. कट्टर धार्मिक नेत्यांनी प्रक्षोभक भाषणं करत जमावाला मंदिर पाडण्यासाठी प्रवृत्त केले. संबधित मंदिर हे 1920 ला बांधलेले असावे, असा अंदाज आहे.