वॉशिंग्टन डी. सी - प्रतिष्ठित ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर 2020’ पुरस्कारासाठी अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची निवड केली आहे. जो बायडेन आणि कमलाहॅरिसनेअमेरिकेचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विभाजनापेक्षा सहानुभूतीमध्ये जास्त शक्ती असल्याचे दर्शवलं. तसेच त्यांनी जगाला आशेचा किरण दाखवला, त्यामुळे दोघांची‘पर्सन ऑफ द इयर 2020’ पुरस्कारासाठीनिवड करण्यात येत आहे, असंटाइम मॅगझीनचे संपादक एडवर्ड फेलसेंथल यांनी म्हटलं.
टाइम मॅगझीनच्या कव्हर पेजवर बायडेन आणि कमला हॅरिस यांचा फोटो प्रकाशित झाला आहे. अमेरिकेची बदलती कहानी, असे शिर्षक या फोटोला दिले आहे.
टाइम मॅगझीनची 1927 पासून पुरस्कार देण्याची पंरपरा आहे. सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोग्गी यांना टाइम मॅगझीनचा 2018 चा पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला होता. तर 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची टाइम मासिकाच्या 'पर्सन ऑफ द इयर २०१६' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
2019 चा पुरस्कार ग्रेटा थनबर्गला -