बीजिंग : युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील स्थितीवरून चीनने अमेरिकेवर हल्लाबोल करत यासाठी सर्वस्वी बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अमेरिका अफगाणिस्तानला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडू शकत नाही असे चीनने स्पष्टपणे म्हटले आहे.
अफगाणिस्तानातील स्थितीसाठी अमेरिका जबाबदार
अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीसाठी अमेरिका जबाबदार असून याचे मूळ अमेरिकाच आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन सोमवारी म्हणाले. ते अशा प्रकारे इथून पळ काढू शकत नाही. अफगाणिस्तानातील गोंधळ दूर करून इथे स्थिरता आणण्यासाठी तसेच अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी अमेरिकेने मदत केली पाहिजे असे वांग म्हणाले.