महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

म्यानमारच्या आंग सॅन सू की यांची सुटका करा, संयुक्त राष्ट्राची मागणी - आंग सॅन सू की बातमी

1 फेब्रुवारी रोजी म्यानमारच्या लष्कराने आणीबाणीजाहीर केली असून अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. आंग सॅन सू की आणि राष्ट्राध्यक्ष वीन मियंट यांना अटक केली आहे. या सर्व नेत्यांना लष्कराने तत्काळ मुक्त करावे, असे संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे.

आंग सॅन सू की
आंग सॅन सू की

By

Published : Feb 5, 2021, 8:06 AM IST

न्युयॉर्क- म्यानमारमध्ये लष्कराने बंड पुकारले सरकार बरखास्त करून सत्ता हाती घेतली आहे. आंग सॅन सू की यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. या सर्व नेत्यांना तत्काळ मुक्त करावे, अशी मागणी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने केली आहे.

संयुक्त राष्ट्राने जारी केले अधिकृत वक्तव्य -

संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद १५ सदस्यीय असून सर्व अधिकार या परिषदेकडे आहेत. म्यानमारच्या लष्कराने तीन दिवसांपूर्वी सत्ता काबीज केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने अधिकृत वक्तव्य जारी करत चिंता व्यक्त केली आहे. "1 फेब्रुवारी रोजी म्यानमारच्या लष्कराने आणीबाणीजाहीर केली असून अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. आंग सॅन सू की आणि राष्ट्राध्यक्ष वीन मियंट यांना अटक केली आहे. या सर्व नेत्यांना लष्कराने तत्काळ मुक्त करावे, असे संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे.

लोकशाही प्रक्रियेने देशातील कारभार चालावा -

लोकशाही प्रक्रियेने म्यानमारमधील कारभार चालावा. तसेच लोकशाही व्यवस्था शाबूत रहावी असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. जनतेवर, पत्रकारांवर आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींवर म्यानमारमध्ये बंधने लादण्यात आली आहेत. त्यावर संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्यनमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर लष्कर आणि सरकारमधील वाद वाढायला लागले होते. या आधाही तेथील लोकशाहीवादी नेत्या आंग सॅन सू की यांना लष्कराने तुरुंगात टाकले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details