कतार - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला अमेरिका-तालिबान दरम्यान शांतता करारावर आज कतारमधील दोहा येथे सह्या झाल्या. या वेळी ३० देशांचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते. या करारानुसार, ५ हजार तालिबानी दहशतवाद्यांना कैदेतून मुक्त करण्यात येणार आहे.
करारावेळी, अमेरिकेचे महासचिव माईक पॉम्पिओ उपस्थित होते. हा करार तेव्हाच प्रभावी होईल. जेव्हा तालिबान शांती कायम ठेवण्याच्या दिशेने कार्य करेल. यासाठी तालिबानला आपले दहशतवादी संघटनांनशी असलेले सर्व संबंध तोडावे लागतील. आमचे तालिबानवर लक्ष राहील. आंतराराष्ट्रीय समुदायावर जेव्हा तालिबान हल्ले करणे बंद करेल. तेव्हाच अमेरिका आपले संपूर्ण सैन्य येथून हटवेल, असे अमेरिकेचे महासचिव माईक पॉम्पिओ म्हणाले.
अफगाण सरकार आणि अमेरिकेच्या तालिबानी दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या युद्धामुळे देशाची स्थिती सध्या जर्जरित बनली आहेत. तालिबान-अमेरिका करारानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य हळहळू माघारी बोलावण्यात येणार आहे. यामुळे अफगाणिस्तामध्ये तब्बल १८ वर्षे चाललेले अमेरिका-तालिबान युद्ध थांबणार आहे.
अमेरिका आणि तालिबानदरम्यान मागील आठवड्यात चर्चा पूर्ण झाली होती. यानंतर २९ फेब्रुवारीपर्यंत ७ दिवसांचा शांतता काळ यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या कराराच्या पार्श्वभूमीवर भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी अफगाण राष्ट्रपती अशरफ गणी, सीईओ अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली होती. तसेच, अफगाणमध्ये शांतता नांदावी, देशाचे संरक्षण आणि विकास यासाठी भारत नेहमी सोबत राहील, असे आश्वासनही दिले.