महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

युक्रेनचे प्रवासी विमान तेहरानजवळ कोसळले; १७० जणांचा मृत्यू - युक्रेनचे विमान तेहरानजवळ कोसळले

युक्रेनचे प्रवासी विमान इराणची राजधानी तेहरानजवळ कोसळल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे.

plane crash
युक्रेनचे प्रवासी विमान तेहरानजवळ कोसळले

By

Published : Jan 8, 2020, 9:38 AM IST

Updated : Jan 8, 2020, 3:01 PM IST

तेहरान - युक्रेनचे प्रवासी विमान इराणची राजधानी तेहरानजवळ कोसळल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे. तेहरानमधील इमाम खोमेनी विमानतळाजवळ विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानातील कर्मचाऱ्यांसह सर्व १७० जणांचा मृत्यू झाला आहे. बोईंग कंपनीचे विमान उड्डान घेतल्यानंतर थोड्याच वेळात तेहरानच्या नैऋत्येकडील परांद या भागात कोसळले.

या विमानामध्ये ८२ इराणी, ६३ कॅनडाचे नागरिक असल्याची माहिती युक्रेनच्या मंत्र्यांनी दिली आहे.

युक्रेनचे आंतरराष्ट्रीय विमान फ्लाईट ७५२ स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.१५ ला तेहरान विमानतळावरून उड्डाण घेणार होते. मात्र, एक तास उशिराने विमानाने उड्डाण घेतले होते. युक्रेनची राजधानी कीव येथील बोरीसपील विमानतळावर हे विमान उतरणार होते, मात्र, उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात ते कोसळले.

Last Updated : Jan 8, 2020, 3:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details