तैपेई -तैवान लष्करामध्ये सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात दोन समलिंगी जोडप्यांनी लग्न केले आहे. समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान हा आशियातील पहिला देश आहे. आतापर्यंत तैवानमध्ये तब्बल 4 हजार समलिंगी जोडप्यांनी लग्न केले आहे.
तैवान लष्करात दोन समलिंगी जोडपे अडकली लग्नबंधनात - तैवानमध्ये समलिंगी विवाह
तैवान लष्करामध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात दोन समलिंगी जोडप्यांनी लग्न केले आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातला पहिला देश आहे.
लष्करामध्ये प्रेम आणि इतर बाबींमध्ये सर्वांना समान मानले जाते, असे चेन यींग ह्युन हिने सांगितले. 27 वर्षीय चेन यींग ह्युन हीने 26 वर्षीय ली.ली-चेनशी लग्न केले आहे. तसेच युमी मेंग आणि वाँग या दोघीही विवाह बंधनात अडकल्या. वाँग ही लष्कारात मेजर पदावर आहे. यावेळी युमी मेंगने सुंदर असा ड्रेस घातला होता. तर वाँगने लष्करी युनिफॉर्म घातला होता.
तैवानमध्ये समलिंगी विवाहासाठी कायदा करावा की, करू नये यासाठी मतदान घेण्यात आलं होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात समलिंगी जोडप्यांनी मतदानाला हजेरी लावली होती. मे 2019मध्ये अखेर तैवानच्या संसदेने समलिंगी विवाहांना कायदेशी मान्यता दिली आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातला पहिला देश आहे.