इस्लामाबाद -तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तैयप एर्दोगान हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. एद्रोगान यांनी शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची बाजू घेतली. तसेच काश्मीर प्रकरणी तुर्की पाकिस्तानला विनाअट पाठींबा देण्यास तयार असल्याचे जाहीर केले.
तुर्कीच्या राष्ट्रपतींनी घेतील काश्मीरप्रकरणी पाकिस्तानची बाजू - Turkey President
तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तैयप एर्दोगान यांनी शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.
![तुर्कीच्या राष्ट्रपतींनी घेतील काश्मीरप्रकरणी पाकिस्तानची बाजू तुर्कीच्या राष्ट्रपतींनी घेतील काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची बाजू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6079713-44-6079713-1581744213271.jpg)
तुर्कीच्या राष्ट्रपतींनी घेतील काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची बाजू
काश्मीरचा मुद्दा हा तुर्कीचाही आहे. काश्मीरमधील जनतेला प्रचंड यातना सहन कराव्या लागत असून तुर्की या दडपशाहीविरोधात आवाज उठवत राहील. १०० वर्षांपूर्वी जे तुर्कीतील कॅनाकलेमध्ये घडलं तेच पुन्हा काश्मीरमध्ये होत आहे. काश्मीर जितके पाकिस्तानला प्रिय आहे. तितकेच ते तुर्कीलाही प्रिय आहे. पाकिस्तान आणि तुर्कीतील संबंध हे प्रेमावर आधारीत आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान आपल्या भाषणामध्ये राष्ट्रपतींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली.