तैपेई :तैवानच्या पूर्व भागामध्ये एक रेल्वे रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये ३४ लोकांचा मृत्यू झाला असून, कित्येक लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वेमध्ये ३५० प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, टेकडीवरुन जाणारा एक ट्रक अपघातामुळे रेल्वे रुळांवर कोसळला होता. नेमकी यावेळी बोगद्यातून येणारी एक रेल्वे या ट्रकला धडकली, आणि रुळावरुन खाली घसरली. या रेल्वेचा कित्येक भाग अजूनही बोगद्यामध्ये अडकला असल्याचे सांगण्यात येत आहे.
टोरोको जॉर्ज सेनिक या भागामध्ये सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला, तर कित्येक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.