महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चिनी ड्रॅगनला गुंतवून ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील - ारत चीन वाद

एफएटीएफ (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) चा सध्याचा अध्यक्ष असलेला चीन, दहशतवादाला वित्तपुरवठा करण्याप्रकरणी पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यापासून वाचवू शकतो. असे असले तरी, भारत-चीन द्विपक्षीय व्यापार वाढत आहे. भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने चीनला जात आहेत. वाद बाजूला सारीन भरताने चीनशी तरूण, क्रीडा, व्यापार अशा मुद्यांवर सुसंवाद साधणे महत्त्वाचे ठरते.

प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Sep 21, 2019, 9:04 PM IST

“एका डोंगरावर दोन वाघ असू शकत नाहीत” अशी एक जुनी चिनी म्हण आहे. एका भौगोलिक भागामध्ये दोन बलाढ्य राष्ट्रांचे अस्तित्व असू शकत नाही. चीन आणि भारत हे आशिया भागावरचे असेच दोन बलाढ्य वाघ आहेत. चिनी भाषेत, चीन स्वतःचा उल्लेख ‘झोंगगौ’ म्हणजेच ‘मध्य साम्राज्य’ असा करतो. अशाने आपण जगाचे केंद्र आहोत, असा संदेश चीन देऊ पाहत आहे. चीनने त्याच्या वर्चस्वाबद्दल अतिशयोक्तीपूर्ण कल्पना केली आहे आणि इतर देशांशी बरोबरीने वागणे त्याला अवघड वाटते.

हेही वाचा -Howdy Modi : पंतप्रधान मोदी आठ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना

भारत आणि चीन ही जगातील दोन प्राचीन सभ्यता आहेत. हिमालय पर्वतरांगांनी या दोन राष्ट्रांना वेगळे केले. 99% वेळा दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध होते, असा दावा बहुतेक चिनी नेते करतात. पूर्व-आधुनिक काळापर्यंत हे सत्य होते. पण, 1950 नंतर चीनच्या कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)च्या प्रभावानंतर या द्विपक्षीय संबंधांची समिकरणे बदलली. चीनचा दृढनिश्चय आणि महत्वाकांक्षा त्याच्या आर्थिक आणि लष्करी प्रगतीवरोबर वाढली आहे. चीनचा जीडीपी भारतापेक्षा कमीतकमी चार पट अधिक आहे. त्यांचे संरक्षण बजेटदेखील खुप आहे. चीनी सैन्याच्या आधुनिकीकरणाची गती कोणाशीही जुळत नाही. माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन म्हणतात की, भारताने अर्थव्यवस्था, सैन्य आणि तंत्रज्ञानाच्या अशा सर्वच दृष्टीने होणाऱ्या चीनच्या लक्षणीय प्रगतीबाबत विचार करण्याची गरज आहे. चीन-पाकिस्तान युतीचा परिणाम अधिक प्राणघातक आणि भारतला आणखी अडथळा आणणारा ठरेल.

हेही वाचा -दहशतवादाविरोधात सर्व राष्ट्रांनी एकवटायला हवं - सय्यद अकबरुद्दीन

भारतासोबत बळजबरीने वैर घेणारा पाकिस्तानला चीनच्या हातातील बाहुली असल्याचा आनंद आहे. त्या बदल्यात ते चीनकडून आर्थिक आणि लष्करी मदतीची अपेक्षा करत आहे. चीन दहशतवादाचा निषेध करतो. परंतु, दहा वर्षांपासून जागतिक दहशतवादी म्हणून भारतविरूद्ध अनेक गुप्त कारवाया करणाऱ्या मसूद अझहर वाचवण्यासाठीदेखील चीननेच प्रयत्न केले आहेत. एफएटीएफ (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) चा सध्याचा अध्यक्ष असलेला चीन, दहशतवादाला वित्तपुरवठा करण्याप्रकरणी पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यापासून वाचवू शकतो. पुढील महिन्यात पॅरिसमध्ये पाकिस्तानवर ही कारवाई केली जाणार होती. .काश्मीरच्या मुद्द्यावरही आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजूने उभी राहणारी चीन ही एकमेव मोठी सत्ता होती

असे असले तरी, भारत-चीन द्विपक्षीय व्यापार वाढत आहे. भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने चीनला जात आहेत. सद्यस्थितीला, सुमारे 21,000 भरतीय 100 चिनी विद्यापीठांमध्ये एमबीबीएस शिकत आहेत. चिनी लोक बॉलिवूडमध्ये चमकतात. तर, दंगलसारखे चित्रपट चीनमध्ये प्रचंड गाजतात. दरम्यान, चीन भारताच्या मुख्य चिंतांबद्दल थोडीशी संवेदनशीलता दर्शवतो. मग तो सीमाप्रश्न असो किंवा दहशतवाद, कींवा मग भारताचे एनएसजी आणि यूएनएससीमधील सदस्यत्व. दुसरीकडे, 'जगाने आपल्या मुख्य हितसंबंधांसाठी आपल्याला शरण यावे' अशी चीनची इच्छा असल्याचे ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र सचिव पीटर वर्गीझ म्हणतात. चीनला रोखणे शक्य नाही, पण त्याच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, असेही वर्गीझ स्पष्ट करतात.

हेही वाचा -पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाई करण्यास मनमोहन सिंग होते सज्ज - कॅमरून

क्वाड (ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत) सारखे गट करणे चीनला नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करते. बाह्य दबावाखाली असताना चीनला थोडासा आवर बसतो. या पार्श्वभूमीवरच वाराणसी शिखर परिषद होणार आहे. वाद बाजूला सारीन भरताने चीनशी तरूण, क्रीडा, व्यापार अशा मुद्यांवर सुसंवाद साधणे महत्त्वाचे ठरते. चीनशी असलेले वैमनस्यपूर्ण संबंध पुन्हा याग्य पद्धतीने व्यवस्थापित करणे हे भारतासाठी आव्हान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details