काबुल - अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींचा क्रूर चेहरा समोर येत आहे. तालिबानींनी अल्पसंख्यांक नागरिकांना ठार केल्याचे रिपोर्टमध्ये आहे. शुक्रवारी इमामांनी प्रार्थनेनंतर एकीचे आव्हान केले आहे. असे असले तरी यापूर्वी सत्तेत असताना तालिबानने केलेल्या छळाच्या आठवणी पुन्हा नागरिकांच्या मनात ताज्या झाल्या आहेत.
तालिबानने 1990 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. त्यानंतर सध्या तालिबानमध्ये सुधारणा झाल्याचा तालिबानींनी दावा केला आहे. अमेरिकेचे सैन्यदल असल्यापासून 20 वर्षांत जे तालिबानींविरोधात लढले, त्यांना माफ करण्यात येणार असल्याचे तालिबानींनी सांगितले. तसेच सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करू, असे आश्वासनही नागरिकांना दिले आहे.
तालिबानने केलेले दावे फोल ठरले-
शुक्रवारीच्या प्रार्थनेनंतर तालिबानींनी नागरिकांना देश सोडून जाऊ नये, अशी विनंती केली आहे. मात्र, अनेक अफगाणी हे तालिबानींच्या सत्तेला भीत आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये महिलांचे हक्क आणि इतर मिळविलेल्या गोष्टी तालिबानमुळे संपुष्टात येण्याची नागरिकांना भीती आहे. अॅमेन्स्टी इंटरनॅशनल या जागतिक मानवी हक्क संघटनेच्या रिपोर्टनुसार अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे तालिबानने केलेले दावे फोल ठरत असल्याचे समोर येत आहे.
पत्रकाराच्या कुटुंबातील सदस्याची हत्या, मुलांचा चेंगरून मृत्यू
जर्मनीच्या प्रसारमाध्यमासाठी काम करणाऱ्या अफगाणिस्तानच्या पत्रकाराच्या कुटुंबातील सदस्याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येत तालिबानी सहभागी असल्याचा संशय रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्सने व्यक्त केला आहे. मोहम्मद नईम हा नागरिक गर्दीतून मार्ग काढत विमानतळावर पोहोचण्यासाठी चार दिवस प्रयत्न करत होता. गर्दीत मुलगा चेंगरू नये, याकरिता त्याला कारच्या टपावर ठेवले होते, अशी नईम यांनी माहिती दिली. गर्दीत काही मुले चेंगरून ठार झाल्याचे नईम यांनी पाहिले. ते खूप भयानक दृश्य होते. ही स्थिती चांगली होईल, असा विश्वासही नईम यांनी व्यक्त केला.
अफगाणिस्तानमध्ये गोंधळाची स्थिती, लूटमार सुरू होण्याची शक्यता