महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अफगाणिस्तानातील निवडणुकीला तालिबान्यांचे आव्हान; तालिबानशी करणार चर्चा

अफगाणिस्तान मध्ये येत्या २८ सप्टेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूका होत आहे. मात्र तालिबान या दहशतवादी संघटनेच्या सक्रियतेमुळे निवडणूकांनी गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी तालिबानशी चर्चा करण्याचे ठरवले आहे.

राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी

By

Published : Jul 28, 2019, 5:24 PM IST

काबूल- अफगाणिस्तानातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्षांनी शांततेवर जोर दिलेला आहे. येत्या २८ सप्टेंबरला येथे राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष अशरफ गणी यांच्यासमोर त्यांच्याविरोधातील इतर १७ उमेदवारांना रोखण्याचे आव्हान आहे. निवडणुकीच्या काळात शांतता रहावी, यासाठी तालिबानशी चर्चा करुन शांततेवर भर दिला जाणार आहे. याआधी सुरक्षेच्या कारणास्तव निवडणुका २ वेळा रद्द करण्यात आल्या होत्या.

तालिबानशी वाटाघाटी केल्याने शांतता येईल, असे गणी यांनी दोन महिन्याअगोदर प्रचार सुरु करतेवेळी सांगितले होते. शांतता मंत्री अब्दुल सलाम यांनी असे म्हटले होते की दोन आठवड्यात तालिबानशी शांततेच्या संदर्भात चर्चा होईल, तसेच यास संयुक्त राष्ट्र देखील प्रोत्साहन देत आहे. तालिबान आता अफगाणिस्तानच्या अर्ध्या भागावर नियंत्रण ठेवतात किंवा त्यांचा प्रभाव आहे. त्यांनी काबूल प्रशासनास बेकायदेशीर मानले असल्याने त्यांनी गणी यांच्या सरकारशी बोलण्यास नकार दिला आहे.

युद्ध बाजूला ठेवून, निवडणुकीपूर्वी देशासमोर रॉकेटिंग गुन्हेगारी, उदासीन अर्थव्यवस्था, बेरोजगारीची वाढ आणि पायाभूत सुविधांचा चुराडा यासह अनेक प्रमुख बाबींचा सामना करावा लागत आहे. निष्पक्ष निवडणुकीच्या संभाव्यतेबाबत मतदार निराश आहेत. अफगाणिस्तानातील नाजूक लोकशाही बिघडविण्याचा प्रयत्न करणारे तालिबान व इतर बंडखोर गटांनी मागील निवडणुकांवर पुन्हा झालेल्या हिंसक हल्ल्याची पुनरावृत्ती केल्याबद्दल अनेकांना चिंता आहे. यंदाची निवडणूक "स्वच्छ" होईल, असा गणी यांनी आग्रह धरला आहे. काबूलमध्ये प्रमुख उमेदवारांनी मोर्चा काढल्यामुळे सुरक्षा दलाने शहरभर गर्दी केली आहे.

अशरफ गणी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला आणि अन्य उमेदवारांच्या मोहिमेचे पोस्टर्स देशभर झळकत आहेत. २०१४ मधील अब्दुल्लाच्या घोटाळ्यानंतर अमेरिकेने बनविलेल्या एका शक्ती-सामायिकरण व्यवस्थेअंतर्गत अब्दुल्ला हे अध्यक्षांचे मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत आहेत. “शांततेच्या कोणत्याही संधींचा फायदा घेणे आपले राष्ट्रीय व धार्मिक कर्तव्य आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी दोनदा निवडणूका तहकूब करण्यात आल्या. त्यामुळे पुढील विलंबामुळे अधिक अशांतता उद्भवू शकते,' असे अब्दुल्ला यांनी प्रचारसभेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details