काबूल - शांततेसाठी प्रयत्न करणारा अफगाणिस्तान आत्मघातकी हल्ल्याच्या घटनेने हादरला आहे. दहशतवाद्याच्या आत्मघातकी पथकाने पूर्व अफगाणिस्तानातील जलालबाद येथील पोलिसांचा तपास नाका स्फोटाने उडविला. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाल्याची अधिकाऱ्याने माहिती दिली.
इसिसच्या आत्मघातकी पथकाचा अफगाणिस्तानात हल्ला ; ११ जण ठार - Jalalbad
इसिस या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्याची माहिती नानगरहार प्रांताच्या गव्हर्नरच्या प्रवक्त्याने दिली. जलालबाद हे शहर पाकिस्तान सीमेलगत आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्याची माहिती नानगरहार प्रांताच्या गव्हर्नरच्या प्रवक्त्याने दिली. जलालबाद हे शहर पाकिस्तान सीमेलगत आहे.
दहशतवादाच्या समस्येने अफगाणिस्तानच्या शांततेला सुरुंग-
गेल्या महिन्यात झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर २० जण जखमी झाले होते. मार्चमध्ये शहरातील विमानतळावजवळ झालेल्या आत्मघातकी पथकाच्या हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हिंसाचाराची लाट उसळलेली असताना गेल्या आठवड्यात १२ हून नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांचा अफगाणिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे.