इस्लामाबाद - पाकिस्तान मध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण भूकंप झाला. या भूकंपामध्ये तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी नोंदवली गेली आहे.
पाकिस्तानमध्ये 6.0 रिश्टरस्केल तीव्रतेचा भीषण भूकंप, 20 जण ठार, 200 पेक्षा जास्त जखमी
पाकिस्तानच्या हरनई प्रांतातील डोगराळ भागातल्या कोळसा खाणीमध्ये आज पहाटे 3.30 च्या सुमारास भूकंप झाला असल्याची माहिती हेरनई प्रांताचे उपायुक्त सुहैल अन्वर शाहीन यांनी दिली. या भूकंपामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे. चार जणांचा कोळसा खाणीतच मृत्यू झाला. आहे.
6.0 रिश्टरस्केल तीव्रतेचा भीषण भूकंप,