महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

श्रीलंकेतील तुरुंगात उसळेलल्या दंगलीत ११ जणांचा मृत्यू - तुरुंगात दंगल बातमी

श्रीलंकेतील सर्वात मोठ्या 'माहार' तुरुंगात दंगल उसळली होती. या दंगलीत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त कैदी जखमी झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 2, 2020, 10:42 PM IST

कोलंबो - श्रीलंकेतील तुरुंगात उसळलेल्या दंगलीत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०७ जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेतील सर्वात मोठ्या 'माहार' तुरुंगात ही घटना घडली. दंगल नियंत्रणात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे संरक्षण विभागाचे सचिव कमाल गुनरत्ने यांनी सांगितले.

कोरोना प्रसारामुळे सुटका करावी - कैद्यांची मागणी

कैद्यांसह तुरुंगातील कर्मचाऱ्यांचाही या दंगलीत मृत्यू झाला आहे. मात्र, सर्वात जास्त मृत्यू कैद्यांचे झाले आहेत. तुरुंगात कोरोनाचा प्रसार झाल्याने सुटका करावी, या मागणीसाठी कैदी आंदोलन करत होते. मात्र, या आंदोलनाचे रुपांतर दंगलीत झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या तुरुंगातील सुमारे १८० कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नशेच्या गोळ्यांचा वापर झाल्याचा संशय

दंगलीत मृत्यू झालेल्या ११ कैद्यांपैकी आठ कैद्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेनंतर सुमारे १०० कैद्यांना जामीनावर घरी सोडण्यात आले आहे. मानसिक रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरुंगातील औषधाच्या स्टोअरवरही कैद्यांनी हल्ला केला होता. कैद्यांनी नशेसाठी यातील काही औषधे वापरल्याचा संशय अधिकाऱ्यांना असून त्याचा तपास सुरू आहे. दंगलीनंतर तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details