नवी दिल्ली - श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोताबाय राजपक्षे हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
हैदराबाद हाऊस येथे घेतली नरेंद्र मोदींची भेट..
राजघाटवर वाहिली महात्मा गांधी यांना श्रद्धांजली..
राष्ट्रपती भवनामध्ये घेतली रामनाथ कोविंद यांची भेट..
गोताबाय यांचे औपचारिक स्वागत..
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची घेतली भेट..
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. कालच (गुरुवार) ते दिल्लीमध्ये दाखल झाले. केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा गोताबाय यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
७० वर्षांच्या गोताबाय यांनी अध्यक्षीय निवडणुकीत झंझावाती विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी सजीत प्रेमदासा यांचा त्यांनी १३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून गोताबाय राजपक्षे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
हेही वाचा : संसद सदस्याने चक्क चालू अधिवेशनात केले प्रियसीला प्रपोज!