महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Vegetable Price Hike in Sri Lanka : श्रीलंकेत भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला, मिरची 700 रुपये तर टोमॅटो 200 रुपये किलो - श्रीलंकेत भाजीपाल्याचे भाव वाढले

श्रीलंकेत ब्रेड आणि दुधासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. तर आयात कमी झाल्यामुले दूध पावडर देखील मिळत नाही आहे. तर 100 ग्रॅम मिरचीची किंमत 18 रुपये होती, ती आता 71 रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव 710 रुपयांवर गेला ( chilly 700 RU KG in shri lanka ) आहे. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात 287 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात खाद्यपदार्थांच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयातीत झालेली घट ( Vegetable Price Hike in Sri Lanka ) असल्याचे सांगितले जात आहे.

Vegetable Price Hike in Sri Lanka
श्रीलंकेत भाजीपाल्याचे भाव भिडले गगणाला

By

Published : Jan 12, 2022, 3:58 PM IST

Updated : Jan 12, 2022, 4:30 PM IST

कोलंबो ( श्रीलंका) :विदेशी कर्जात बुडालेल्या श्रीलंकामध्ये महागाई ही आभाळ शिवत आहे. परिस्थिती अशी आहे की खाण्यापिण्याच्या गोष्टीसह डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्व गोष्टीवर याचा परिणाम अर्थसत्तेवर झाले ( sri lanka economic crisis ) आहे.

महागाई गगनाला भिडली -

श्रीलंकेत ब्रेड आणि दुधासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. तर आयात कमी झाल्यामुले दूध पावडर देखील मिळत नाही आहे. तर 100 ग्रॅम मिरचीची किंमत 18 रुपये होती, ती आता 71 रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव 710 रुपयांवर गेला ( chilly 700 RU KG in shri lanka ) आहे. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात 287 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात खाद्यपदार्थांच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयातीत झालेली घट ( Vegetable Price Hike in Sri Lanka ) असल्याचे सांगितले जात आहे.

सप्टेंबर महिन्यापासून आर्थिक आणीबाणी लागू -

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आर्थिक आणीबाणी लागू ( Economic emergency in sri lanka ) केली होती. त्यांनी लष्कराला जिम्मेदारी दिली होती की श्रीलंकेतील सर्व नागरिकांना सामान हे योग्य दरात देण्यात यावे.

गॅसच्या किमतीत 90 टक्के वाढ -

बीबीसीच्या एका अहवालानुसार, श्रीलंकेच्या राष्ट्रीय बॅंक म्हणजेच 'सेंट्रल बैंक ऑफ श्रीलंका'ने जानेवारीमध्ये आफिसीअल प्रतिक्रिया देऊन सांगितले होते. की, मागील वर्षातील डिसेंबर 2020 च्या नंतर महागाई दर हा 12.1 प्रतिशद वाढला होता. हा दर नोव्हेंबर पर्यंत 9.5 टक्के झाला होता. श्रीलंकेतील खाण्याच्या वस्तूमध्ये मागील एका महिन्यात 15 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत 90 टक्के वाढ झाली आहे. 12.5 किलोग्रामचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर हा 1400 रुपये होता तो आता वाढून 2,657 रुपये झाला आहे.

हेही वाचा -Home Minister Orders Inquiry : पोलीसांच्या बदल्यांची यादी फुटली कशी? गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Last Updated : Jan 12, 2022, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details