इस्लामाबाद :पाकिस्तानच्या मुलतानमध्ये भरधाव बस पलटून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सुमारे १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, नऊ जण जखमी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचेही समजत आहे.
चालकाचा ताबा सुटल्याने अपघात..
सिंध प्रांतामध्ये असलेल्या उथाल या गावात हा अपघात झाला. वेगात जात असल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती शरीफ अहमद या पोलीस अधिकाऱ्याने दिली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.