जाकार्ता - चीनी बायोफार्मास्युटिकल कंपनी सिनोवॅक बायोटेकने बनवलेल्या कोविड -19 लसीचे 18 दशलक्ष डोस गुरुवारी इंडोनेशियात दाखल झाले. याची पुष्टी इंडोनेशियातील शासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
सिन्हुआच्या वृत्तानुसार, 6 डिसेंबरला 12 लाख डोसची पहिली तुकडी पोहोचली होती. आता आलेली लसीची दुसरी तुकडी असल्याचे इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रेटनो मासुर्डी यांनी सांगितले. 'इंडोनेशियात सिनोवॅक लसीचे आधीच 30 लाख डोस आहेत,' असे त्यांनी व्हर्चुअल पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोग्यमंत्री बुदी गुनादी सादिकिन म्हणाले की, कोविड - 19 साथीच्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण करणे ही इंडोनेशियाची एक महत्त्वाची रणनीती आहे.
हेही वाचा -ब्रिटनमध्ये कोविड रुग्णसंख्येत 24 तासांत नोंदवली सर्वाधिक वाढ