बीजिंग - चीनमध्ये चाकू हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला. उत्तर पूर्वेकडील लायोनिंग प्रांतात रविवारी ही घटना घडली. पोलिसांनी संशयीत हल्लेखोराला अटक केल्याची माहिती सीजीटीएन या सरकारी माध्यमाने दिली आहे. लोयोनिंग प्रांतातील कायूयान शहरात ही घटना घडली. सात व्यक्ती जखमी झाल्याची माहितीही मिळत आहे.
सात जण जखमी -
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळू शकली नाही. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये हल्ल्याच्या घटना कमी प्रमाणात घडतात. मात्र, मागील काही वर्षात चाकू आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.
चिनी कायद्यानुसार बंदुक बाळगण्यास बंदी -
चिनी कायद्यानुसार बंदुक बाळगण्यास आणि विक्री करण्यास मनाई आहे. त्यामुळे चाकू आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ले होतात. अनेक वेळा हल्लेखोर घरात स्फोट तयार करूनही हल्ला करतो. मानसिक रुग्ण किंवा एखाद्याचा बदला घेण्यासाठी असे हल्ले होण्याचे प्रमाण दिसून येते. शाळेतील मुले किंवा सर्वसामान्य नागरिकांवर राग व्यक्त करण्यासाठी हल्ले होत असल्याचेही पुढे आले आहे.