महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मक्का मशीद पर्यटकांसाठी १ ऑक्टोंबरपासून होणार खुले - मक्का मशीद बातमी

मागील आठवड्यातच पुढिल महिन्यापासून मक्का आणि मदिना या दोन पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी उमरावांना (मुस्लीम भाविक) परवानगी दिली आहे. ऑक्टोंबर महिन्यात उमरावांना प्रवेश देताना एकावेळी फक्त ३० जणांना या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. विदेशी लोकांना १ नोव्हेंबर पासून या ठिकाणी भेट देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच यावेळी सर्व योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे ही माहिती सुदाईस यांनी दिली.

Saudi to reopen Mecca facilities for visitors in Oct
मक्का मशीद पर्यटकांसाठी १ ऑक्टोंबरपासून होणार खुली

By

Published : Sep 27, 2020, 4:23 PM IST

रियाध - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. तसेच लॉकडाऊन सौदी अरेबियामध्ये सुद्धा करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे मुस्लीम समाजाचे पवित्र स्थान असलेली मक्का मशीद ही भाविकांसाठी मागील काही महिने बंद ठेवण्यात आली आहे. परंतू आता ऑक्टोंबर महिन्यात ही मशीद खुली करण्याचा निर्णय सौैदी अरेबिया सरकराने घेतल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या मशिदीच्या व्यवस्था समितीचे अध्यक्ष अब्दुल रहमान अल सुदाईस यांनी शनिवारी दिलेली माहिती अशी, की काबा किस्वासाठी किंग अब्दुल अजिझ कॉम्पलेक्स हळूहळू पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसेच दोन पवित्र मशिदींच्या आर्किटेक्चर व ग्रँड मस्जिद ग्रंथालयाचे प्रदर्शन ही त्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. भाविक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या खबरदारीच्या उपायांचे पालन करण्याची सक्ती करण्यात येणार आहे.

मागील आठवड्यातच पुढिल महिन्यापासून मक्का आणि मदिना या दोन पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी उमरावांना (मुस्लीम भाविक) परवानगी दिली आहे. ऑक्टोंबर महिन्यात उमरावांना प्रवेश देताना एकावेळी फक्त ३० जणांना या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. विदेशी लोकांना १ नोव्हेंबर पासून या ठिकाणी भेट देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच यावेळी सर्व योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे ही माहिती सुदाईस यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details