मॉस्को - रशियाच्या ( Russia ) सायबेरियातील कोळशाच्या खाणीला ( Coal mining )लागलेल्या आगीत गुरुवारी 52 खाण कामगार आणि बचावकर्ते ठार झाल्याचे रशियन वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. आतापर्यंत शोध पथकाला 14 मृतदेह (Russia Mine Incident) सापडले आहेत. तर खाणीत स्फोटक मिथेन वायू आणि आगीतून विषारी धुके जास्त प्रमाणात निर्माण झाल्याने 38 व्यक्तींचा शोध सुरक्षिततेच्या कारणास्वत थांबवण्यात आला आहे.
सायबेरियाच्या केमेरोवो प्रदेशातील लिस्तव्याझनाया खाणीत एकूण 285 लोक होते. बचाव पथकांनी 239 खाण कामगारांना बाहेर काढले. यात 49 जण जखमी झाले. मिथेनचे स्फोट दुर्मिळ असतात. मात्र, खाणीत हा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली.