आम्ही युक्रेनमध्ये अभ्यास करण्यासाठी आलो आहोत. भारत सरकार आणि राजदूत कार्यालायने आम्हाला भारतात लवकरात लवकर आणावे, अशी दोन विद्यार्थिनींनी युक्रेनमधून विनंती केली आहे.
Russia Ukraine crisis live updates : ब्लादिमीर पुतीन यांनी उद्योगांची बोलाविली बैठक; विविध देशांच्या निर्बंधांवर करणार चर्चा - रशियाने युक्रेनविरोधात पुकारले युद्ध
22:53 February 24
आम्हाला भारतात लवकरात लवकर आणावे- दोन विद्यार्थिनींची सरकारकडे विनंती
22:44 February 24
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर चर्चा, भारताने ही व्यक्त केली चिंता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर चर्चा केली आहे. रशिया आणि नाटोमधील मतभेद हे प्रामाणिक आणि गांभीर्याने केलेल्या चर्चेनेच सुटले जाऊ शकतात, या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे.
युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी व नागरिक अडकले आहेत. त्याबाबत पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. भारतीयांना देशात सुरक्षित आणण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांच्या हितासाठी राजनैतिक गट आणि अधिकाऱ्यांनी नियमित संपर्क राहण्याबाबत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मतैक्य दर्शविले आहे.
22:40 February 24
रशियाकडून नागरी जग हे पोलादी पडदा टाकून बंद करण्याचा प्रयत्न - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
आम्ही केवळ मिसाईलचे स्फोट, विमानांचे आवाज ऐकले नाहीत. रशियाकडून नागरी जग हे पोलादी पडदा टाकून बंद करण्यात येत असल्याचे आवाज आल्याची उद्विग्न प्रतिक्रिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे.
22:32 February 24
ब्लादिमीर पुतीन यांनी उद्योगांची बोलाविली बैठक; विविध देशांच्या निर्बंधांवर करणार चर्चा
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेसह जपाने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. या निर्बंधाबाबत विचार करण्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मॉस्कोमध्ये बैठक बोलाविली आहे.
22:30 February 24
4 हजार भारतीयांनी गेल्या काही दिवसांत युक्रेन देश सोडला - परराष्ट्र मंत्रालय
ऑनलाईन नोंदणीप्रमाणे युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय आहेत. 4 हजार भारतीयांनी गेल्या काही दिवसांत युक्रेन देश सोडला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या कक्षाला रोज 980 फोन आणि 850 ई-मेल येत आहेत.
22:29 February 24
युक्रेनमधील भारतीय नागरिकांकरिता सर्वोतपरी मदत करा- पंतप्रधानांच्या परराष्ट्र मंत्रालयाला सूचना
परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनमधील भारतीय नागरिकांकरिता सर्वोतपरी मदत करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या आहेत. ही माहिती परराष्ट्र मंत्रालय सचिव हर्ष व्ही. श्रींगला यांनी दिली आहे. युक्रेनमधील सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षण घेण्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही सचिवांनी सांगितले.
20:40 February 24
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करण्याची शक्यता - सूत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या चर्चा करण्याशी शक्यता असल्याचे सुत्राने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलाविली आहे.
20:29 February 24
युक्रेनमध्ये अडकलेल्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय; भारतीय राजदुत कार्यालयाने जारी केला व्हिडिओ
युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. 200 हून अधिक विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय भारतीय राजदूत कार्यालयाने कार्यालयाशेजारी असलेल्या शाळेत केली आहे. त्याबाबतचा व्हिडिओ राजदूत कार्यालयाने शेअर केला आहे.
19:26 February 24
युक्रेनची राजधानी किवीवमध्ये भारतीयांसाठी 24 तास मदतकार्य सुरू - राजदूत पार्थ सत्पथी
युक्रेनची राजधानी किवीवमध्ये भारतीयांसाठी 24 तास मदतकार्य सुरू - राजदूत पार्थ सत्पथी
युक्रेनची राजधानी किवीवमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी भारतीय राजदूत कार्यालयाकडून मदतकार्य सुरू आहे. जर कोणी किवीवमध्ये अडकले असतील तर त्यांनी मित्र, कुटुंब, भारतीय समुदायाचे सदस्य आणि भारतीय राजदूत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन युक्रेनमधील भारतीय राजदूत पार्थ सत्पथी यांनी केले आहे.
17:31 February 24
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय व विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता सरकारकडून सर्व उपाययोजना
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय व विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता सरकारकडून सर्व उपाययोजनानवी दिल्ली- केंद्री संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी युक्रेनमधील युद्धस्थितीवर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की भारताला शांतता हवी आहे. युद्धाला चिथावणी देण्यासाठी स्थिती होऊ नये. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय व विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता आमच्या सरकारकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
16:52 February 24
युक्रेनच्या संरक्षण दलाचा विभाग असलेल्या भूभागात धुरांचे लोट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी राजधानी किवीवच्या पूर्व भागात सैन्यदलाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनवरील संकट वाढत चालले आहे. युक्रेनच्या संरक्षण दलाचे मंत्रालय असलेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धुर दिसून येत असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
16:16 February 24
युक्रेनची राजधानी किवीवमधील भारतीय राजदूत कार्यालय सुरू राहणार - भारताचा निर्णय
युक्रेनची राजधानी किवीवमधील भारतीय राजदूत कार्यालय सुरू आणि खुले राहणार आहेत. संकटाच्या काळात मार्ग शोधण्यासाठी आम्ही मिशन पद्धतीने काम करत आहोत, असे युक्रेनमधील भारतीय राजदूत पार्थ सत्पथी यांनी म्हटले आहे.
15:58 February 24
शहरातील कानाकोपऱ्याचे संरक्षण करण्यासाठी तयार राहा- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेनस्काय
ज्यांना देशाचे संरक्षण करण्याची इच्छा आहे, त्यांना आम्ही शस्त्रे देणार आहोत. युक्रेनच्या शहरातील कानाकोपऱ्याचे संरक्षण करण्यासाठी तयार राहा, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेनस्काय यांनी जनतेला केले आहे.
15:31 February 24
युक्रेनने रशियाबरोबरील राजनैतिक संबंध तोडले
रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेन देशाने विविध पर्यायांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेनस्काय यांनी रशियाबरोबरील राजनैतिक संबंध तोडले आहेत. ही माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
15:18 February 24
रशियाच्या हल्ल्यात 40 युक्रेन जवानांचा मृत्यू
युक्रेन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या सल्लागाराने दिलेले माहितीनुसार 40 युक्रेन जवनांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जखमी झाल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रशिाने युक्रेनवर हल्ला केल्याने जगात चिंता व्यक्त होत आहे.
15:16 February 24
इतिहासात अनेकदा भारताने शांतीदुताची भूमिका बजावली आहे-डॉ. इगोर पोलिखा
पंतप्रधान मोदी हे पुतीन यांना बोलू शकतात. इतिहासात अनेकदा भारताने शांतीदुताची भूमिका बजावली आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी तुमच्या मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचे युक्रेनचे भारतामधील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी म्हटले आहे.
15:04 February 24
रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू असताना भारताने हस्तपक्षेप करावा- युक्रेनचे भारतामधील राजदूत
रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू असताना भारताने हस्तपक्षेप करावा, अशी विनंती युक्रेनचे भारतामधील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलावे, असेही युक्रेनचे राजदूत पोलिखा यांनी म्हटले आहे.
15:00 February 24
युक्रेनमधील नागरिकांना निवडीचा मुक्त अधिकार - ब्लादिमीर पुतिन
जे सध्याच्या युक्रेनमध्ये राहत आहेत, त्यांना रशिया संघराज्य ( USSR ) असताना किंवा दुसऱ्या महायुद्धानंतरसारखे बांधणी करायला आम्ही सांगत नाही. सध्या जे युक्रेनमध्ये आहेत, त्यांना निवडीचा मुक्त अधिकार आहे. त्यांना अधिकाराचा आनंद करायला हवा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे.
14:54 February 24
सध्याच्या घटना या युक्रेन आणि युक्रेन नागरिकांच्या हितावर आक्रमण करणारे नाही - ब्लादिमीर पुतीन
सध्याच्या घटना या युक्रेनचे हित आणि युक्रेन नागरिकांच्या हितावर आक्रमण करणारे नाही. ज्यांनी युक्रेनला ओलीस ठेवले, ते आमच्याविरोधात वापरण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी केला आहे.
14:48 February 24
सध्याच्या घडीला आम्हाला भारताकडून मदतीची अपेक्षा - युक्रेनचे भारतामधील राजदूत
नवी दिल्ली- सध्याच्या घडीला आम्हाला भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. साम्राज्यवादी देशाकडून लोकशाही देशावर आक्रमण होत असताना भारताने जागतिक भूमिका पार पाडायला हवी. मोदी हे जगातील सर्वाधिक शक्तीशाली आणि सन्मानीय नेते आहेत, असे युक्रेनच्या भारतामधील राजदुतांनी म्हटले आहे.
14:43 February 24
युक्रेनने रशियाची 5 लढाऊ विमाने पाडली- युक्रेनच्या राजदुतांचा दावा
नवी दिल्ली- युक्रेनच्या भारतामधील राजदुताने सांगितले, की संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार युक्रेनने रशियाची 5 लढाऊ विमाने, 2 हेलिकॉप्टर, 2 रणगाडे आणि काही ट्रक उद्धवस्त केली आहेत.
13:54 February 24
युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी देशातील नागरिकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले आहे. जो कोणी शस्त्र हाताळू शकतो आणि सक्षम आहे, तो प्रादेशिक संरक्षण दलाच्या श्रेणीत सामील होऊ शकतो, असे म्हटलं.
11:48 February 24
लुहान्स्क प्रदेशात पाच रशियन विमाने आणि एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचे युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे.
11:21 February 24
182 भारतीयांसह विशेष UIA विमान युक्रेनहून दिल्लीत दाखल झाले.
11:21 February 24
रशिया-युक्रेनमधील परिस्थिती मोठ्या संकटात येण्याचा धोका आहे, असे भारताने UNSC मध्ये म्हटले आहे
10:18 February 24
युक्रेने स्व:ताचा बचाव करेल आणि जिकेंल - युक्रेनचे परराष्ट्र मंत्री
युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेल. पुतिन यांनी नुकतेच युक्रेनवर संपूर्ण आक्रमण केले आहे. जग पुतीनला थांबवू शकते आता कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं.
10:16 February 24
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी युक्रेन देश सोडला. विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांचा समावेश असलेले युक्रेनचे विशेष विमान दिल्लीत दाखल झाले.
09:50 February 24
शेअर बाजारवर परिणाम
रशियाने युद्ध पुकारताच शेअर बाजारवर परिणाम झाला आहे. सेन्सेक्स हजार अंकांनी गडगडला आहे.
09:50 February 24
अमेरिकेचा रशियाला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाने युद्ध पुकारताच निवदेन जारी केली आहे. रशियाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा गर्भित इशारा दिला आहे. या हल्ल्यामुळे होणारी हानी आणि मृत्यूला रशिया एकटी जबाबदार असेल असंही ते म्हणाले.
09:46 February 24
जगभरात इंधन महागणार
व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. यानंतर लगेचच च्च्या तेलाची किंमत १०० डॉलर्सपार झाली आहे. जगभरात इंधन महागणार आहे.
09:35 February 24
ब्लादिमीर पुतीन यांनी उद्योगांची बोलाविली बैठक; विविध देशांच्या निर्बंधांवर करणार चर्चा
मॉस्को - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ( Russia-Ukraine crisis updates ) युक्रेनविरोधात सैनिकी कारवाई ( Russia Declares War On Ukraine ) करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत. शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियाने म्हटलं आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे. पुतीन यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 'लुगान्स्क पीपल्स रिपब्लिक (Lugansk Peoples Republic )' आणि 'डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक ( Donetsk Peoples Republic )' यांना स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता देणाऱ्या दोन आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. डोनेस्तक आणि लुगान्स्क ही युक्रेनमधील दोन राज्ये आहेत. येथील रशियन समर्थक फुटीरतावाद्यांनी युक्रेन सरकारविरुद्ध युद्ध पुकारले आहे. गेल्या दिवसांपासून ते युक्रेनपासून वेगळा स्वतंत्र देश होण्याच्या प्रयत्नात होते. गेल्या आठ वर्षांपासून युक्रेनचे सैन्य या फुटीरतावाद्यांशी लढत आहे.
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकरल्याने हे युरोपात 1945 नंतरचं हे सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होऊ शकते.
हेही वाचा -Russia-Ukraine dispute : रशियाची भूमिका तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल का...