महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चिंताजनक..! प्रथमच मनुष्याच्या शरीरात आढळला बर्ड फ्लूचा विषाणू, रशियात 7 बाधित - बर्ड फ्लू विषाणू माणसात

रशियाच्या शास्त्रज्ञांना एच५एन८ एन्फ्लूएन्झा A टाईप गटातील विषाणू एका व्यक्तीच्या शरीरात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. एच५एन८ या विषाणूमुळे बर्ड फ्लूचा संसर्ग होतो. पक्ष्यांमधील हा आजार आता माणसांत पोहोचला आहे.

बर्ड फ्लू
बर्ड फ्लू

By

Published : Feb 21, 2021, 10:43 AM IST

Updated : Feb 21, 2021, 4:27 PM IST

मॉस्को - रशियामधून चिंता वाढवणारी माहिती पुढे येत आहे. बर्ड फ्लू विषाणू प्रथमच मानवी शरीरात आढळला असून सात व्यक्ती या विषाणूने बाधित असल्याचे समोर आले आहे. हे सातही जण एका पोल्ट्री फार्ममधील कामगार आहेत. या कामगारांमध्ये रशियाच्या शास्त्रज्ञांना एच५एन८ एन्फ्लूएन्झा A टाईप गटातील विषाणू आढळून आल्याने चिंता वाढली आहे. एच५एन८ या विषाणूमुळे बर्ड फ्लूचा संसर्ग होतो. पक्ष्यांमधील हा आजार आता माणसांत पोहचला आहे.

सातही कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर -

रशियाच्या शास्त्रज्ञांनी याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. रशियाच्या दक्षिण भागातील एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या सात कामगारांना बर्ड फ्लूची लागण झाली. या सर्व कामगारांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सातही कामगारांना सौम्य लक्षणे असून प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातही पसरला होता बर्ड फ्लू -

मागील काही दिवसांपूर्वी भारतातही बर्ड फ्लूने थैमान घातले होते. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यात अचानकपणे पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. अनेक स्थलांतरित पक्षी मृत्यूमुखी पडले होते. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत स्पष्ट झाले होते. राज्यातील नंदुरबार जिल्ह्यासह अनेक भागात पोल्ट्री पक्ष्यांचा मृत्यू झाला होता.

Last Updated : Feb 21, 2021, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details