महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना लसीच्या उत्पादनास रशियाची सुरुवात; मात्र जगभरात साशंकता - रशिया कोरोना लस दावा

राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी लसीला मान्यता देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी आपल्या एका मुलीलाही लसीचा डोस दिल्याचे सांगितले होते. रशियाने तयार केलेली लस चाचण्यांच्या पातळीवर यशस्वी ठरली असून रुग्णामध्ये प्रतिकारक्षमता वाढत असल्याचे दिसू आल्याचे ते म्हणाले.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 15, 2020, 5:54 PM IST

मॉस्को -कोरोनावर लस शोधल्याचा दावा रशियाने नुकताच केला आहे. या लसीचे उत्पादन सुरू केल्याची माहिती आता समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाचा हवाला देत स्थानिक माध्यमांनी ही बातमी दिली आहे. मंगळवारी रशियाने लसीला मान्यता दिली. जगभरातून तज्ज्ञांकडून रशियाने तयार केलेल्या लसीवर शंका उपस्थित करण्यात येत असली तरी रशिया आपल्या दाव्यावर ठाम आहे.

राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी लसीला मान्यता देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी आपल्या एका मुलीलाही लसीचा डोस दिल्याचे सांगितले होते. रशियाने तयार केलेली लस चाचण्यांच्या पातळीवर यशस्वी ठरली असून रुग्णामध्ये प्रतिकारक्षमता वाढत असल्याचे दिसू आल्याचे ते म्हणाले. मात्र, रशियाने लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याचे कोणतेही पुरावे दिले नाहीत, त्यामुळे या लसीवर शंका उपस्थित केली जात आहे.

रशियाने तयार केलेल्या लसीचे नाव स्पूटनिक-5 असे आहे. लसीची चाचणी महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्यावर असताना सरकारने लसीची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या श्वसनविकारावरील एका वरिष्ठ डॉक्टरने तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्तही नुकतेच समोर आले आहे.

सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्पूटनिक-5 ची नोंदणी थांबवावी, अशी डॉ. अलेक्झांडर चुचॅलिन यांचे मत होते. मात्र, तसे न केल्याने त्यांनी राजीमाना दिला. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्खो यांनी कोरोनावरील लसीचे दोन आठवड्यात उत्पादन करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले होते. त्यानुसार आता उत्पादन सुरू करण्यात आले आहे. असे असले तरी जगभरात रशियाने विकसित केलेल्या कोरोना लसीबाबत साशंकता आहे.

‘स्पूटनिक-5’ ही किती परिणामकारक आहे, याची माहिती उपलब्ध झाली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले. कोणत्याही लसीला मान्यता मिळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या नैतिक परिषदेची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक असते. लस मानवासाठी किती सुरक्षित आहे, आधी हे पाहावे, असे चुचॅलिन यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details