टोकियो (जपान) -जपानच्या ईशान्य भागातील फुकूशिमा आणि मियागी या दोन शहर परिसरात६.२ रिश्टर स्केलचे भुकंपाचे धक्के बसले. मात्र, यामुळे त्सुनामीचा धोका नसून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.
जपानमधील फुकूशिमात ६.२ रिश्टर स्केल भुकंपाचा धक्का
६.२ रिश्टर स्केलचे भुकंपाचे धक्के जपानच्या ईशान्य भागातील फुकूशिमा आणि मियागी या दोन शहर परिसरात बसले आहेत. आता मात्र, त्सुनामीचा धोका नसून कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.
जपान हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, "जपानच्या ईशान्य किनारपट्टीवरील समुद्रसपाटीपासून ५० किमी अंतर खाली भुकंपाचे केंद्रबींदू असून, ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला आहे." या भूकंपाने फुकूशिमा आणि मियागी प्रदेशातील विस्तृत भूभाग हादरला आहे. सार्वजनीक वृत्तवाहिनी एनएचकेच्या माहितीनुसार 'भुकंपग्रस्त भागातील पथक तेथील अणुभट्ट्यांचा तपास करत आहे.' दरम्यान, २०११ मध्ये फुकूशिमा शहराला भूकंप आणि त्सुनामीचा मोठा धक्का बसल्याने खूप नुकसान झाले होते.