महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Russia-Ukraine crisis : पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले, लष्करी मोहिमेची घोषणा - Russia-Ukraine crisis updates

शियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची ( Russia-Ukraine Conflict ) घोषणा केली आहे. रशियाने युक्रेनच्या लष्कराला 'शस्त्र खाली' टाकावे असे म्हटलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले. मात्र, अमेरिकेच्या मुत्सदेगिरी अपयश आल्याचे दिसून येत आहे.

Russia-Ukraine crisis
युक्रेन-रशिया संघर्ष

By

Published : Feb 24, 2022, 9:00 AM IST

Updated : Feb 24, 2022, 9:13 AM IST

मॉस्को - युक्रेन आणि रशियासंदर्भात आताच्या घडीला सर्वांत मोठी बातमी ( Russia-Ukraine crisis updates ) समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची ( Russia-Ukraine Conflict ) घोषणा केली आहे. रशियाने युक्रेनच्या लष्कराला 'शस्त्र खाली' टाकावे असे म्हटलं आहे. युद्धाची घोषणा पुतीन यांनी निवेदनात केली. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले. मात्र, अमेरिकेच्या मुत्सदेगिरी अपयश आल्याचे दिसून येत आहे.

युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, क्रमातोस्कमध्ये 2 स्फोट ऐकू आले आहेत. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. दोन लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत.

व्लादिमीर पुतिन यांनी 'लुगान्स्क पीपल्स रिपब्लिक (Lugansk Peoples Republic )' आणि 'डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक ( Donetsk Peoples Republic )' यांना स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता देणाऱ्या दोन आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. बंडखोर क्षेत्रांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्याचा सोमवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनचा निर्णय ( President Vladimir Putin decision ) जवळपास आठ वर्ष जुन्या फुटीरतावादी संघर्षाला अनुसरतो. ज्यामध्ये 14,000 हून अधिक लोक मारले गेले होते. डॉनबासचा पूर्वेकडील औद्योगिक परिसर उद्ध्वस्त झाला होता. पुतीन यांच्या नवीन निर्णयाचा जगभरातील अनेक देशांनी निषेध केला आहे.

रशिया-युक्रेन वाद -

सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र, अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकरणात वादंग पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कनेक्शन? 'या' प्रकरणात झाली अटक

Last Updated : Feb 24, 2022, 9:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details