महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

हाफिज सईदविरोधात गुन्हा दाखल, पाकिस्तान सरकारची कारवाई - terorrist

अल अन्फाल ट्रस्ट, दावत उल ईर्शाद ट्रस्ट यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निधी गोळा करून दहशवादी कारवायांसाठी तो पैसा वापरल्याचाही आरोप हाफिज सईदवर ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

हाफिज सईद

By

Published : Jul 3, 2019, 11:42 PM IST

इस्लामाबाद - जमात-उद-दावा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद आणि आणखी काहीजणांविरोधात दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात त्याच्यावर दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली आहे. लाहोर, गुजरंजनवाला आणि मुल्तान येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

अल अन्फाल ट्रस्ट, दावत उल ईर्शाद ट्रस्ट यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निधी गोळा करून दहशवादी कारवायांसाठी तो पैसा वापरल्याचाही आरोप हाफिज सईदवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पाकिस्तान सरकराने कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. तसेच, त्याच्यावर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारच्या या कारवाईमुळे दहशवादी संघटनांविरुद्ध पाकिस्तान सरकार कठोर निर्णय घेत असल्याचं दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details