महाराष्ट्र

maharashtra

'शार्ली हेब्दो'कडून पुन्हा प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र प्रकाशित.. पाकिस्तानात आंदोलन

By

Published : Sep 6, 2020, 6:07 PM IST

तेहरिक- ए-लबैक पाकिस्तान (TLP) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी फ्रान्स सरकारचा झेंडा पेटवून निषेध व्यक्त केला. शार्ली हेब्दो साप्ताहिक आणि फ्रान्स सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

French satirical weekly
कराचीत आंदोलन

कराची -फ्रान्समधील शार्ली हेब्दो साप्ताहिकाने पुन्हा एकदा मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढले आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कराची शहरात आंदोलन करण्यात आले. कराची शहरात मुस्लिम समुदायाने शार्ली हेब्दो साप्ताहिक आणि फ्रान्स सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

तेहरिक- ए-लबैक पाकिस्तान (TLP) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी फ्रान्स सरकारचा झेंडा पेटवून निषेध व्यक्त केला. शार्ली हेब्दो साप्ताहिक आणि फ्रान्स सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रेषित मोहम्मद यांचे चित्र काढणे मुस्लिम धर्मात निषिद्ध मानले जाते. मात्र, फ्रान्समधील शार्ली हेब्दो साप्ताहिकाने त्यांचे व्यंगचित्र काढले आहे. त्यामुळे मुस्लिमांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

२०१५ सालीही काढले होते वादग्रस्त व्यंगचित्र

शार्ली हेब्दो या साप्ताहिकाने २०१५ साली प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर साप्ताहिकाच्या कार्यालयावर कट्टर समुदायाकडून हल्ला झाला होता. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला होता.

या प्रकरणी आता १४ आरोपींविरोधात सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे साप्ताहिकाने पुन्हा एकदा व्यंगचित्र छापले आहे. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details