नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर जोरदार टीका केली. मात्र, जगाने काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले. एकदा तोंडावर आपटूनही पाकिस्तानचे मन अजून भरलेले नाही. आसाममधील नागरिकत्व नोंदणी कार्यक्रमावर आता इम्रान यांनी टीका केली आहे. मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी मोदी सरकारचा हा नियोजनबद्ध डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी नागरिकत्व नोंदनी कार्यक्रमावर टि्वट केले आहे. मोदी सरकार भारतातील मुस्लीम बांधवांना लक्ष्य करत आहे.काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय आणि आसाममधील नागरिकत्व नोंदणी प्रकारातून भारत सरकार मुस्लीम समाजाला लक्ष्य करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या कटू नितीची जगभराने दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे ही वाचा -चक्क एका पाकिस्तानी नेत्याने गायले 'सारे जहाँ से अच्छा'