कीव -रशिया युक्रेन युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू झाल्यानंतरचा आज 14 वा ( Russia Ukraine War 14th day ) दिवस आहे. या युद्धाचे जगभर परिणाम उमटत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. आपला देश सोडून युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी युद्ध संकटात अडकले आहेत. यात भारतासह पाकिस्तानी विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने गंगा मिशन राबवले आहे. या मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात येत आहे. यातच भारतीय प्रशासानाने एका युक्रेनमध्ये अडकलेल्या एका पाकिस्तानी विद्यार्थींनीला मदत केल्याचे समोर आले आहे. या तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कीवमधील भारतीय दूतावासाचे आभार ( Pakistani Student Thanks Indian Embassy ) मानले आहेत.
अस्मा शफीक असे पाकिस्तानी तरुणीचे नाव आहे. तीला भारतीय संघाने युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढले आहे. ती लवकरच घरी परतणार आहे. या मदतीबद्दल अस्मा यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय दूतावासाचे आभार मानले आहेत. अस्मा म्हणाली, 'माझे नाव अस्मा शफीक आहे. आम्हाला शक्य ती सर्व मदत दिल्याबद्दल मी कीवमधील भारतीय दूतावासाची आभारी आहे. अतिशय कठीण परिस्थितीत आम्ही इथे अडकलो होतो. मी भारताच्या पंतप्रधानांचा देखील आभारी आहे की त्यांच्यामुळेच आम्ही इथून बाहेर पडू शकले, मदत केल्याबद्दल भारतीय दूतावासाचे आभार, मी सुखरूप घरी जात आहे, असे तीने म्हटलं आहे.