महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'पत्नी बुशरा बीबीशिवाय मी जगू शकत नाही', पाक पंतप्रधान इम्रान खान - पाक पंतप्रधान इम्रान खान बुशरा बीबी न्यूज

'पत्नी बुशरा हिच्याशिवाय आपण जगू शकत नाही,' असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्या खूप बुद्धीमान असल्याचेही त्यांनी सांगितले. डेर स्पीगल या जर्मन मासिकाशी बोलताना पत्नीला 'सोलमेट' म्हणून संबोधले.

पाक पंतप्रधान इम्रान खान
पाक पंतप्रधान इम्रान खान

By

Published : Oct 31, 2020, 5:52 PM IST

इस्लामाबाद - 'पत्नी बुशरा हिच्याशिवाय आपण जगू शकत नाही,' असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्या खूप बुद्धिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

बुशरा बीबी या इम्रान खान यांची तिसरी पत्नी आहेत. इम्रान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्याच्या 6 महिने आधी त्यांच्याशी लग्न केले होते. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, खान यांनी डेर स्पीगल या जर्मन मासिकाशी बोलताना हे वक्तव्य केले. 'मी सर्व काही तिच्याबरोबर शेअर करतो. मला सरकारमध्ये अडचणी येत असतील किंवा गुंतागुंतीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, तर मी पत्नीशी चर्चा करतो. केवळ एका मूर्ख माणूसच आपल्या पत्नीबरोबर सर्व काही शेअर करत नाही,' असे इम्रान म्हणाले.

हेही वाचा -भारत-अमेरिका संरक्षण करारामुळे सरकली पाकिस्तानच्या पायाखालची जमीन

इम्रान यांनी या वेळी आपल्या पत्नीला 'सोलमेट' म्हणून संबोधले. 'मी तिच्याशिवाय जगू शकत नाही,' असे ते म्हणाले.

इम्रान खान अनेकदा आपल्या पत्नीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत असतात. पीटीआय सरकारचे पहिले 100 दिवस पूर्ण झाल्यावरही त्यांनी 'जीवनातील असा कठीण काळ' हाताळण्याचे श्रेय आपल्या पत्नीला दिले.

हेही वाचा -फ्रान्सची द्वेषयुक्त ट्वीटबद्दल महाथिर यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details