इस्लामाबाद -पाकिस्तान संसदेत शुक्रवारी जोरदार राडा झाला. अर्थसंकल्प प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी विशेष सत्र बोलविण्यात आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधीपक्षांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाली. परिस्थिती इतकी बिकट झाली की काही खासदार सभागृहाबाहेर पडले. या गदारोळात एक महिला खासदार जखमी झाल्याची माहिती आहे.
शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने आपला तिसरा अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी हा अर्थसंकल्प पूर्णपणे नाकारला. मंगळवारी यावर चर्चा होणार होती. मात्र, संसदेत गोंधळ उडाल्याने चर्चा तर दुरच प्रस्तावही मांडण्यात आला नाही.
इम्रान खान यांच्या सरकारने नुकतेच तीन तीन वर्षे पूर्ण केली आहेत. तर शौकत हे त्यांचे चौथे अर्थमंत्री आहेत. अर्थमंत्री शौकत तारीन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला होता. शौकत आणि त्याचा भाऊ जहांगीर तारीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. शौकत आणि जहांगीर इम्रानच्या जवळ असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.