महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

फ्रान्सविरोधात पाकिस्तानात आंदोलन, मॅकराॅन यांच्या मुस्लिम धर्मावरील वक्तव्याचा निषेध - फ्रान्स विरोधी आंदोलन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅकरॉन यांनी मुस्लिम धर्माबद्दल केलेले वक्तव्य वादात सापडले आहे. मॅकरॉन यांच्या विरोधात मुस्लिम देशांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाकिस्तान आंदोलन
पाकिस्तान आंदोलन

By

Published : Oct 27, 2020, 10:12 PM IST

लाहोर - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅकरॉन यांनी मुस्लिम धर्माबद्दल केलेले वक्तव्य वादात सापडले आहे. मॅकरॉन यांच्या विरोधात मुस्लिम देशांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानातील लाहोर शहरात फ्रान्स विरोधात आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

मुस्लिम देशांतूनही निषेध

आंदोलकांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅकरॉन यांच्या विरोधी घोषणा दिल्या तसेच फ्रान्सचा झेंडा जाळून निषेध केला. 'आम्ही फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅकरॉन यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. फ्रान्सच्या मालावर सर्व मुस्लिम देशांनी बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो, असे एक आंदोलक म्हणाला. पाकिस्तानने फ्रान्सबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून टाकावे आणि राजदुताला माघारी पाठवावे, अशी मागणी आणखी एका आंदोलकाने केली.

शिक्षकाच्या हत्येनंतर वाद पेटला

जगभरातील मुस्लिम देशांनी मॅकरॉन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अनेक आखाती देशांनी फ्रान्सच्या मालावर बहिष्कार घातला आहे. पाकिस्तानातही मोठे आंदोलन उभे राहिले आहे. फ्रान्समधील शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते.

काय म्हणाले फ्रान्सचे राष्टाध्यक्ष ?

व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅकरॉन यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच जगभरात मुस्लिम धर्म संकटात असल्याचे ते म्हणाले. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लिम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details