कराची- तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांना भविष्याची चिंता भेडसावू लागली आहे. अफगाणी नागरिक हे युरोप, अमेरिका आणि इतर देशांमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी मानवी तस्करांचे व्यवसाय चांगलेच वाढले आहेत.
तालिबानी हे काबुलमध्ये जण्यापूर्वी अफगाणिस्तानच्या सीमेवरून 1 हजार लोक हे गेल्या आठवड्यात पाकिस्तानात पोहोचले. ही माहिती हमीद गुल याने दिली आहे. अफगाणी नागरिकाला पाकिस्तानात नेण्यासाठी किती पैसे घण्यात आले, याची त्याने माहिती दिलेली नाही.
हेही वाचा-जम्मू काश्मीर : राजौरीतील चकमकीत दहशतवादी ठार, सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला वीरमरण
बलोचिस्तान प्रांतानजीक असलेल्या शमन, शाघी आणि बदानी येथून मानवी तस्करी वाढल्याचे सूत्राने सांगितले. क्वेट्टा येथे साक्षरतेचे मासिक चालविणारे डॉ. शाह मोहम्मद मॅर्री म्हणाले, की तालिबानने अफगाणिस्तान घेण्यापूर्वी मानवी तस्करी वाढली आहे. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात लोंढे जात आहेत. चालू वर्षात 55 हजार अफगाणी हे पाकिस्तानमध्ये बलोचिस्तानमधून गेले आहेत. त्यामध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश आहे. त्यांना अफगाणिस्तानमधील युद्ध आणि संघर्षापासून दूर जायचे आहे. पाकिस्तानात जाणारे अफगाणी बहुतांश हे शिया मुस्लिम किंवा ताजिक्स आहेत.
हेही वाचा-मुनव्वर रानाकडून तालिबानचे समर्थन, म्हणाले भारतात रामराज नाही, कामराज!