दहशतवादास मिळणाऱ्या आर्थिक पाठबळास पायबंद घालण्यासंदर्भात पाकिस्तानने आपली भूमिका मांडली. तसेच दहशतवादामागील कुख्यात सूत्रधार (मास्टरमाईंड) हाफीझ सईद कारवाई केली. त्यावर जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या आर्थिक कृती कार्यसमितीने (एफएटीएफ) पाकिस्तानला अद्यापी पूर्णत: निर्दोषत्वाचा निर्वाळा दिलेला नाही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखालील या समितीच्या सदस्य मंडळाची नुकतीच पॅरिस येथे तीन दिवसीय बैठक पार पडली. यामध्ये "पाकिस्तानने २७ पैकी १४ मुद्यांवर बऱ्यापैकी कृती दर्शविली आहे. याशिवाय कृती कार्यक्रमामधील उर्वरित मुद्यांसंदर्भातही विविध स्तरीय प्रगती दिसून आली आहे, अशा आशयाची भूमिका जाहीर करण्यात आली. मात्र, काळ्या यादीमध्ये समावेश होण्यापासून रोखावयाचे असेल तर पाकिस्तानने यादीमधील सर्व २७ मुद्यांसंदर्भात येत्या ४ महिन्यांत समाधानकारक कृती करावी, अशी कडक ताकीद एफएटीएफकडून देण्यात आली आहे.
जून २०२० पर्यंत कृती कार्यक्रमामधील सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याचे स्पष्ट आवाहन एफएटीएफकडून पाकिस्तानला करण्यात आले आहे. अन्यथा, पुढील सदस्य अधिवेशनापर्यंत (प्लेनरी) दहशतवादावरील कारवाई संदर्भात शाश्वत प्रगती पाकिस्तानकडून दाखविण्यात न आल्यास एफएटीफकडून कारवाई करण्यात येईल. या कारवाई अंतर्गत पाकिस्तानशी असलेले व्यावसायिक हितसंबंध व आर्थिक व्यवहार यांच्याकडे विशेष लक्ष पुरविण्याचे आवाहन एफएटीफकडून सदस्य व त्यापलीकडीलही आर्थिक संस्थांना करण्यात येईल,” अशा आशयाचे निवेदन एफएटीफच्या प्लेनरी बैठकीच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अध्यक्षांच्या भाषणाच्या सारांशाचा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात आले.
२०५ देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि कार्यक्षेत्रांमधील मधील ८०० पेक्षाही जास्त सदस्यांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला होता. पाकिस्तानचे नाव काळ्या यादीमधून हटविले जाण्यासंदर्भात पाकिस्तानी नेतृत्व आशावादी होते. मात्र ’ग्रे लिस्ट’ मधून नाव हटविले जाण्यासाठी आवश्यक असलेली ३९ पैकी १४ मते मिळविण्यात पाकिस्तानला अपयश आले. मात्र, काळ्या यादीस नकार देण्यासंदर्भात पाकिस्तानकडे चीन, मलेशिया आणि तुर्कस्तान या तीन समर्थक देशांची मते अद्याप आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमधील अधिकाधिक सदस्यांनी पुढील बैठकीपर्यंत पाकिस्तानला काळ्या यादीमध्ये ढकलण्याऐवजी 'ग्रे लिस्ट’ मध्ये ठेवण्यास प्राधान्य दिले. जून २०१८ पासून, दहशतवादावर कारावाई आणि दहशतवादी संघटनांना पैसा पुरवण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी एफएटीएफ आणि याचीच उपसंस्था असलेल्या एपीजी (एशिया प्लेनरी ग्रुप)ने एकत्रित काम करण्याविषयी उच्चस्तरीय राजकीय कटिबद्धता दर्शविली आहे. एफ़एटीएफने पाकिस्तानला आर्थिक गैरव्यव्हार आणि दहशतवादास आर्थिक पाठबळ पुरविले जाण्यासंदर्भात केलेली कारवाई दर्शवण्यास सांगितले.