महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकचा यू-टर्न.. इमरान खान आता म्हणतात दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नाही - एफएटीएफ

पाकिस्तानने दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये किनारपट्टीच्या ठिकाणी राहत असल्याचे कबूल केले होते. त्यानंतर 24 तासांच्या आतच पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये नाही, असे इमरान खान सरकार म्हटलं आहे.

पाकिस्तान
पाकिस्तान

By

Published : Aug 23, 2020, 3:00 PM IST

Updated : Aug 23, 2020, 6:19 PM IST

इस्लामाबाद - फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (एफएटीएफ) द्वारे काळ्या यादीत घातले जाईल, या भीतीपोटी अखेर पाकिस्तानने दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये किनारपट्टीच्या ठिकाणी राहत असल्याचे कबूल केले होते. त्यानंतर 24 तासांच्या आतच पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये नाही, असे इमरान खान सरकारने म्हटलं आहे.

पाकिस्ताने 88 दहशतवाद्यांवर बंदी घातली आहे. दहशतवाद्यांच्या यादीमध्ये दाऊचाही समावेश असल्याचे पाकिस्ताननं म्हटलं होतं. मात्र, या वक्तव्याने अडचणीत अल्याने पाकिस्तानने दाऊद कराचीच राहत नसल्याचं सांगत घुमजाव केला. दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये राहत नसून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या निराधार आणि चुकीच्या आहेत. भारतीय माध्यमांद्वारे केलेले दावे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं पाक परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

दरम्यान, शनिवारी पाकिस्तानने दाऊदवर आर्थिक निर्बंध घातल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या काही तासांत इमरान खान सरकारने दाऊद पाकिस्तानमध्ये नसल्याचे जाहीर केले. यामुळे पाकिस्तानच्या वागण्यात सुधारणा झालेली नाही, हे पुन्हा उघड झाले. 1993 च्या मुंबई बाँबस्फोट साखळीचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत अनेक वर्षे करत आला आहे. या बाम्बस्फोटात 257 जणांना आपले जीव गमवावे लागले होते

Last Updated : Aug 23, 2020, 6:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details