महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 10, 2021, 7:36 AM IST

Updated : Jan 10, 2021, 7:45 AM IST

ETV Bharat / international

मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकने लख्वीला जबाबदार धरावं - अमेरिका

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार लख्वीला पाकिस्तानी दहशतवाद विरोधी न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानात अनेक दहशतवादी मोकाट फिरत असून त्यामुळे जागतिक स्तरावरून कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे. मुंबई हल्ल्यासाठी लख्वीला जबाबदार धरावे, अशी मागणी अमेरिकेने पाकिस्तनाकडे केली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन. डी. सी - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झाकी-उर-रहमान-लख्वी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने ही कारवाई केली. लख्वीच्या अटकेनंतर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. २००८ साली मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने लख्वीला जबाबदार धरावे, अशी मागणी अमेरिकेने केली आहे.

दहशतवादी हल्ल्यांबद्दलही जबाबदार धरा -

पाकिस्तानी न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेच्या आशिया विभागाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, लख्वीचे गुन्हे फक्त दहशतवादाला पैसे पुरवण्यापुरतं मर्यादित नाही. दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबद्दलही त्याला शिक्षा व्हायला हवी, यात मुंबई हल्ल्याचाही समावेश आहे, असे ट्विट अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केले आहे.

पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव -

मुंबई हल्ल्याचा सुत्रधार लख्वीला पाकिस्तानी दहशतवाद विरोधी न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानात अनेक दहशतवादी मोकाट फिरत असून त्यामुळे जागतिक स्तरावरून कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे. त्यातच जागतिक आर्थिक कृती दलाने पाकिस्तानला करड्या यादीत टाकले आहे. या यादीतून बाहेर पडण्याठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारातने उचलला दहशतवादाच मुद्दा -

लख्वीला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केले आहे. तीन गुन्ह्यात त्याला शिक्षा करण्यात आली असून १ लाख पाकिस्तानी रुपये दंडही ठोठावला आहे. पाकिस्तानने मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करावी, ही मागणी भारताने कायमच लावून धरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने आवाज उठवला आहे. मात्र, पाककडून भारताच्या मागणीवर डोळेझाक करण्यात येत होती. मात्र, आता फायनान्शिअल टास्क फोर्सच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तानने पुढील महिन्यात होणाऱ्या एफटीएच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे भारताने शुक्रवारी म्हटले आहे.

Last Updated : Jan 10, 2021, 7:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details