काश्मीर संबंधित आर्टिकल ३७० मध्ये बदल आम्हाला मान्य नाही - पाकिस्तान - bjp
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याशी संबंधित आर्टिकल ३७० हटविण्याविषयी पक्ष वचनवद्ध असल्याचे वारंवार सांगितले आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानने काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या भारतीय संविधानातील आर्टिकल ३७० रद्द करणे आम्हाला मान्य नाही, असे म्हटले आहे. हे संयुक्त राष्ट्राच्या नियमांचे उल्लंघन ठरेल.
आर्टिकल ३७० नुसार जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कोणताही नियम थेटपणे लागू करता येत नाही. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय आणि समवर्ती सूचींअंतर्गत येणाऱ्या विषयांसंबंधी थेट कायदा बनवता नाही. येथे संसदेच्या संमतीने थेट कायदा बनवता येत नसल्याने संसदेच्या निर्णयांना मर्यादा पडतात. तसेच, अंमलबजावणी करण्यावरही मर्यादा येतात.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० रद्द केले जाण्याविषयी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. हे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन ठरेल, असे ते म्हणाले. हे पाकिस्तान कधीही मान्य करणार नाही, असे फैसल यांनी म्हटले आहे. तसेच, काश्मीरचे लोकही हे मान्य करणार नाहीत, असे ते म्हणाले.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याशी संबंधित आर्टिकल ३७० हटविण्याविषयी पक्ष वचनवद्ध असल्याचे वारंवार सांगितले आहे.