इस्लामाबाद -पाकिस्तानमधील अनेक मंत्री बऱ्याचदा हास्यास्पद विधाने करतात. या यादीमध्ये आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नावही जोडले गेले आहे. ग्लोबल वार्मिंगबाबत इम्रान खानने एक अतिशय हास्यास्पद विधान केले आहे. झाडे रात्री ऑक्सिजन सोडतात, असे इम्रान खान एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले. या विधानानंतर समाज माध्यमांवर त्याची खिल्ली उडवली जात आहे.
इम्रान खान म्हणाले...'झाडे रात्री ऑक्सिजन सोडतात', नेटकऱ्यांनी केले ट्रोल - pakistan pm imran khan
पाकिस्तानमधील अनेक मंत्री बऱ्याचदा हास्यास्पद विधाने करतात. या यादीमध्ये आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नावही जोडले गेले आहे.
इम्रान खानचा 15 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झाडे हवा स्वच्छ करतात आणि रात्री ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात, असे इम्रान खान म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
झाडे आपणास दिवसा ऑक्सिजन देतात आणि कार्बनडाय ऑक्साइड शोषूण घेतात, तर रात्रीच्या वेळी हीच प्रक्रिया या उलट होते. वैज्ञानिकांच्या शोधानुसार पिंपळाचे झाड एकमेव असे झाड आहे, जे दिवसरात्र 24 तास ऑक्सिजन देते.