इस्लामाबाद -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी वक्तव्ये करत गरळ ओकली आहे. भारताने काहीही 'आगळीक' केल्यास 'पाकिस्तानचे बलवान सैन्य' भारताला 'चांगला धडा' शिकवेल, असे वक्तव्य केले आहे.
भारतीय नेतृत्वाने पाकिस्तानला युद्धाच्या धमक्या देणे टाळावे, असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर येथे 'काश्मीर एकता दिना'निमित्त झालेल्या सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. खान यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आले, याचाही उल्लेख केला. 'नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कर प्रमुख, तुम्ही दोघांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर तुम्हा दोघांसाठी हा माझा संदेश आहे. तुम्ही याआधीच ५ ऑगस्टला एक चूक केली आहे. पाकिस्तानची २०० दशलक्ष जनता आणि पाकिस्तानचे बलवान सैन्य मिळून भारताला चांगला धडा शिकवतील', असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - कोरोनाचे थैमान सुरूच, चीनमध्ये मृतांचा आकडा ६३८ वर