नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन अण्वस्त्रधारी शेजार्यांमध्ये युद्धाच्या शक्यतेविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला अणूहल्ला करण्याची धमकी दिली होती. आता काश्मीरप्रकरणी भारताला साथ देणाऱ्या इतर देशांनाच पाकिस्तानच्या एका मंत्र्याने धमकी धमकी दिली आहे.
पाक व्याप्त काश्मीरमधील काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान प्रांताचे मंत्री अली अमीन गंडापूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 'काश्मीरप्रकरणी भारताला समर्थन देणार देश आमचे शत्रू आहेत. त्या देशांवर आम्ही रॉकटे हल्ला करू', अशी धमकी देत असल्याचं ते व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.