इस्लामाबाद - मंगळवारी सकाळी पाकिस्तानी लष्कराचे विमान रावळपिंडी शहराजवळील रबाई प्लाझा भागामध्ये कोसळले. या अपघातात २ वैमानिक आणि इतर ३ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच घरांवर विमान कोसळून नागरिकांचाही मृत्यू झाला.
पाकिस्तानी लष्कराचे विमान नागरी भागात कोसळले, १९ ठार - plane crash
या अपघातात २ वैमानिक आणि इतर ३ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच घरांवर विमान कोसळून नागरिकांचाही मृत्यू झाला.

लष्कराचे विमान
नियमित उड्डानावेळी लष्कराच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. यामध्ये मृतांचा आकडा १९ वर पोहचला आहे. अपघातानंतर ४ ते ५ घरांना आग लागली. त्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन दल आणि बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. लष्कराने घटनेचा तपास सुरु केला आहे.