नवी दिल्ली - काश्मीर मुद्द्यावरून कायम ढवळाढवळ करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तान सतत भारताच्या अंतर्गत विषयामध्ये लक्ष घालत आहे. मात्र, त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर येईल. जर पाकिस्तानला खरच काश्मिरी नागरिकांच्या कल्याणासाठी काही करायचे असेल तर त्यांनी दहशतवाद, हिंसा आणि भारताविरोधातील खोटा प्रचार थांबवावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
'पाकिस्तानला काश्मीरसाठी खरच काही करायचं असेल तर...दहशतवाद थांबवा' - इम्रान खान काश्मीर मुद्दा
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारत विरोधी वक्तव्ये करत आहेत. मात्र, काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबद्दल बोलायला पाकिस्तानला कोणताही हक्क नाही.
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारत विरोधी वक्तव्ये करत आहेत. मात्र, काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबद्दल बोलायला पाकिस्तानला कोणताही हक्क नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताने जम्मू काश्मीरची स्वायतत्ता काढून घेत या प्रदेशाचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले आहे. मात्र, त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून पाकिस्तानचा त्यावर बोलण्याचा अधिकार नाही, असा पवित्रा कायम भारताने घेतला आहे. आता जगभर पसरलेल्या महामारीमुळे काश्मीर मुद्दा मागे पडला आहे. तरीही पाकिस्तान सतत यावरून भारताला लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे.