इस्लामाबाद/लंडन - पाकिस्तानमध्ये मीडियावर वाढत्या सेन्सॉरशिपच्या अहवालांमुळे पाक परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना एका केनेडियन पत्रकाराने मध्येच थांबवले. लंडनमध्ये पत्रकार परिषदेत या पत्रकाराने सरकारविषयी तक्रार केल्यानंतर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट निलंबित केल्याचा आरोप केला.
लंडनमध्ये पाक पराराष्ट्रमंत्र्यांना मीडियाने घेरले, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर 'ही' प्रतिक्रिया
पाकिस्तानी पत्रकार मुनिजा जहांगीर यांनी टि्वटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. या क्लिपमध्ये इजरा लेव्हेट या पत्रकाराने 'बोलण्याच्या स्वातंत्र्याविषयी बोलण्यासाठी एका 'अट्टल ठगा'ला निमंत्रित करताना आयोजकांना लाज वाटायला हवी,' असे म्हटले आहे.
कुरेशी गुरुवारी येथे 'मीडियाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करा' यावर बोलत होते. या वेळी ही घटना घडली. याच्या काही दिवस आधी पाकिस्तानात इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाने तुरुंगात असलेल्या माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या मुलाखतीचे प्रसारण केल्याबद्दल ३ खासगी टीव्ही वाहिन्यांचे ट्रान्समिशन रद्द करण्यात आले होते.
स्थानिक वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, 'पाकिस्तान सरकार कायद्याचे उल्लंघन करत आहे, असे लिहिलेले ट्विट ट्विटर कंपनीनेच हटवले आहे. हे ट्विट या केनेडियन पत्रकाराने केले होते. त्याचे पूर्ण अकाऊंट बंद झाले नाही. मात्र, हे ट्विट हटवल्याविषयीचा ई-मेल त्याला मिळाला आहे.' 'मी कॅनडामध्ये आहे. अमेरिकेच्या मर्यादेत ट्विटरचा वापर करतो. तरीही माझे ट्विट हटवले गेले. पाकिस्तानातून माझ्या ट्विटरला सेन्सॉर करण्यात आले. पाकिस्तान सरकारची तक्रार केली, हेच त्याचे कारण होते,' असे या पत्रकाराने म्हटले आहे.
पाकिस्तानी पत्रकार मुनिजा जहांगीर यांनी टि्वटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. या क्लिपमध्ये इजरा लेव्हेट या पत्रकाराने 'बोलण्याच्या स्वातंत्र्याविषयी बोलण्यासाठी एका 'अट्टल ठगा'ला निमंत्रित करताना आयोजकांना लाज वाटायला हवी,' असे म्हटले आहे.
या आरोपांनंतर कुरेशी यांनी या आरोपाचा थेट इन्कार केला. 'पहिली बाब ही की, तुम्हाला तुमच्या वक्तव्याचा आदर केला जायला हवा असेल, तर तुमची भाषा पहा. ही योग्य पद्धत आहे का? तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुम्च्या दुटप्पीपणाला तुम्ही स्वातंत्र्य म्हणता. अनेकदा तुम्ही एखादा विशेष अजेंडाही चालवता,' असे कुरेशी यांनी म्हटले. ३ टीव्ही वाहिन्या बंद करणे, पत्रकारांना अटक आणि सेन्सॉरशिप यांच्या गडद होणाऱ्या संकटाविषयी बोलताना त्यांनी पत्रकारांचे तोंड बंद करण्याचा काही संबंधच नसल्याचे म्हटले. अशा प्रकारची दुटप्पी भूमिका घेतल्यामुळे कुरेशी यांना टीकेचे लक्ष्य व्हावे लागले.