महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानात आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता...

By

Published : May 10, 2020, 10:11 AM IST

देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता केली आहे.

Imran Khan
Imran Khan

लाहोर -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून पाकिस्तानमध्येही कोरोनाच फैलाव झाला आहे. देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता केली आहे. पाकिस्तानध्ये आतापर्यंत 618 मृत्यू झाले असून 28 हजार कोरोनाबाधित आहेत.

मार्च अखेरला देशात बंदची अंमलबजावणी करण्यात आली होती. आता आर्थिक पेचप्रसंगामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. आज सकाळपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत व्यवसाय सुरू करावे, असे सरकारने जाहीर केले. दरम्यान पाकिस्तान मेडिकल असोसिएशनच्या (पीएमए) प्रतिनिधींनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलचे निरीक्षण करून कठोर लॉकडाउन लागू करण्याची मागणी केली आहे.

सध्या पाकिस्तान दोन संकटाचा सामना करत आहे. एक म्हणजे कोरोनावर अटकाव आणणे आणि दुसरे म्हणजे उपासमार होणाऱ्या लोकांना वाचवणे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता केल्याने पाकिस्तानात कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढण्याचा धोक आहे. जगातील इतर देशामध्ये करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यता आले आहे. सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details