इस्लामाबाद - भारता शेजारील पाकिस्तानात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत ४९५ जणांना नागरिकांना लागण झाली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंध प्रांतात सर्वात जास्त २५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पंजाब आणि बलुचिस्तानात बाधितांचा आकडा ९० च्या पुढे गेला आहे. पाकिस्तानातील स्थिती भारतापेक्षाही गंभीर बनली आहे.
सार्क देशांंपैकी सर्वात जास्त कोरोना बाधित पाकिस्तानात, 495 जणांना बाधा - कोरोनाव्हायरस उपचार
पाकिस्तानात अनेक खासगी इमारतीमध्ये रुग्णालये सुरू करण्यात आले आहेत. तर मोकळ्या जागेतही क्वारेंटाईनची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
पाकिस्तानात अनेक खासगी इमारतीमध्ये रुग्णालये सुरू करण्यात आले आहेत. तर मोकळ्या जागेतही क्वारंटाईनची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानपुढे कोरोनाचे नवे संकट उभे राहीले आहे. नुकतेच कोरोनाचा बिमोड करण्यासाठी सार्क राष्ट्रांतील प्रमुखांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सर्वांनी मिळून कोरोनाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली.
जगभरामध्ये कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत ११ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी सतत वाढत आहे. तर सुमारे २ लाख ७० जणांना जगभरात कोरोनाची लागण झाली आहे. दिलासा देणारी बातमी म्हणजे सुमारे ९० हजार कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले आहेत.