महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

आर्टिकल ३७० : संयुक्त राष्ट्रामध्ये जाण्याच्या पाकच्या निर्णयाला चीनचा पाठिंबा - कुरेशी - चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी

पाकिस्तनाचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी घाईघाईने चीनचा दौरा केला. यावेळी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी भेट घेऊन भारताच्या निर्णयावर चर्चा केली. तसेच काश्मीर प्रश्नी चीनेन चिंता व्यक्त केली.

आर्टिकल ३७०

By

Published : Aug 10, 2019, 8:39 AM IST

बिजींग - जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तान आंतराष्ट्रीय पातळीवर मदत मागत फिरत आहे. पाकिस्तनाचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी घाईघाईने चीनचा दौरा केला. यावेळी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी भेट घेऊन भारताच्या निर्णयावर चर्चा केली. तसेच काश्मीर प्रश्नी चीनेन चिंता व्यक्त केली.

काश्मीर मुद्दा दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्राच्या नियमावलीनुसार शांततेने सोडवावा, असे आवाहन परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी केले. भारत पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीरवरून जुना वाद असून दोन्ही देशांनी संयम दाखवावा. आणखी तणाव वाढेल अशी कोणतीही कृती दोन्ही देशांनी करु नये, असे चीनचे म्हटले आहे. काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत नेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाला चीनने पाठिंबा दर्शवला आहे, असे कुरेशी यांनी म्हटले आहे.

भारताने जम्मू काश्मीर राज्याला लागू असलेले ३७० कलम रद्द केले. तसेच राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले. या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताबरोबरचे राजनैतिक संबध तोडले आहेत. तसेच व्यापारी संबधही तोडले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आंतरराष्ट्रीय स्तरावर या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत. मात्र, काश्मीर मुद्दा भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्तानचा त्याच्याशी काहीही संबध नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

काश्मीरबाबत भारताच्या निर्णयामुळे चीनची सार्वभौमत्वचा धोक्यात येत असल्याचे चीनेन बोलले होते. मात्र, चीन आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबध असूनही चीनने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शवला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details