नवी दिल्ली - भारतासह पाकिस्तानमध्येही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील पूर परिस्थितीचे रिपोर्टिंग करणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकाराला अनेक जणांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
पाकिस्तानच्या पत्रकाराची गळ्यापर्यंत पाण्यात बुडून रिपोर्टिंग; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Water
पाकिस्तानमधील पूर परिस्थितीचे रिपोर्टिंग करणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकाराला अनेक जणांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
पाकिस्तानच्या पत्रकाराची गळ्यापर्यंत पाण्यात बुडून रिपोर्टिंग
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाकिस्तानातील सिंधू नदीला पूर आला आहे. या नदीची स्थिती दाखवताना पाकिस्तानी पत्रकार गळ्यापर्यंत पाण्यात बुडून रिपोर्टिंग करत आहे. त्याच्या रिपोर्टिंग करण्याच्या पद्धतीमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी पत्रकार जावेरिया सिद्दिकी यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या ट्विटरवर अनेकजण कमेंट करत असून या व्हिडीओची खिल्ली उडवत आहेत.