महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाक पंतप्रधान आज पाकव्याप्त काश्मीरला भेट देण्याची शक्यता - पाकव्याप्त काश्मीर

इम्रान पीओकेमधील विधानसभेला संबोधित करणार असल्याचे पाकिस्तान रेडिओने म्हटले आहे.

इम्रान खान

By

Published : Aug 14, 2019, 10:31 AM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज पाकच्या स्वातंत्र्यदिनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणार आहेत. पीओकेमधील मुझफ्फराबादला ते भेट देणार असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. इम्रान तेथील विधानसभेला संबोधित करणार असल्याचे पाकिस्तान रेडिओने म्हटले आहे.

भारताने जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले आर्टिकल ३७० रद्द केले. इस्लामाबादकडून या कृतीचा निषेध करण्यात आला होता. मात्र, भारताने पाकच्या या प्रतिक्रियेला कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे इम्रान यांनी हे पाऊल उचलल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details